For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक भारत गौरवकाशी दर्शन यात्रा विशेष रेल्वे 24 पासून

11:43 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक भारत गौरवकाशी दर्शन यात्रा विशेष रेल्वे 24 पासून
Advertisement

बेळगाव : भारतीय रेल्वे व कर्नाटक सरकारच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्नाटक भारत गौरवकाशी दर्शन’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 24 ऑगस्टपासून ही यात्रा निघणार आहे. 9 दिवस, 8 रात्रींसाठी भारत गौरव यात्रा असणार आहे. भारतीय रेल्वेने उत्तर भारतातील वाराणसी, अयोध्या, गया व प्रयागराज येथे जाण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. बेंगळूर येथून निघणारी ही एक्स्प्रेस बेळगावमध्येही थांबणार आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांनाही या एक्स्प्रेसमध्ये सहभाग घेता येणार आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक प्रवाशाला 7500 रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे. इच्छुकांनी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.