कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेत २३ वर्षीय महिलेचा तिच्या पतीने गळा दाबून खून केला. विकृतीचा कळस म्हणजे पतीने महिलेच्या आई-वडिलांना संपूर्ण घटना दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉलसुद्धा केला होता.
Husband Kills Wife | विकृतीचा कळस, पत्नीला फास लावून तिच्या घरच्यांना केला व्हिडिओ कॉल
मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. संशयित पतीवर पत्नीला गळफास लावून, तिच्या वेदना दाखवणारा व्हिडिओ बनवून तो मित्र आणि कुटुंबीयांसोबत शेअर केल्याचा आरोप आहे.
Uttarakhand Bridge Collapsed | उत्तराखंडमध्ये १६ कोटींचा पूल कोसळला अन् चारधाम यात्रा झाली स्थगित
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पती-पत्नीमधील सततच्या भांडणांमुळे भाग्यश्री सुमारे दोन महिन्यांपूर्वी प्रवीणला सोडून माहेरी गेली.
प्रवीण तिच्या आई-वडिलांकडे घरी गेला आणि आम्ही दोघे शांततेने एकत्र राहतो असे आश्वासन देऊन तिला परत घेऊन आला, पण घरी परतल्यानंतर त्याच संध्याकाळी त्याने तिची हत्या केली.
व्हिडिओ कॉलवर पालकांना दाखवले
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रवीणने भाग्यश्रीला गळफास घेतल्यानंतर तिच्या वेदनांचे चित्रीकरण केले. श्वास घेण्यासाठी धडपडत असलेल्या तिच्या आई-वडिलांनाही त्याने कथितरित्या व्हिडिओ चित्रित करून आपल्या मुलीचा मृत्यू पाहण्यास भाग पाडले.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, संशयित प्रविणने पत्नीचा वेदनेने तडफड करतानाचा व्हिडिओ आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर केला. गुन्ह्याची माहिती मिळताच बिलागी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्वरेने तपास सुरु केला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.