For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध; सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन

08:20 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध  सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन
Advertisement
इंदापूर, प्रतिनिधी : दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी हिताचा विचार करून राजकीय मतभेद बाजूला ठेवत महात्मा फुलेनगर-बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या 21 संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली. या निर्णयातून इंदापूर तालुक्यात सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन घडले आहे.

बुधवारी (दि. 4) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी 21 जागांसाठी 21 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

Advertisement

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील, राकेश शुक्ला, रवींद्र सरडे, शांतीलाल शिंदे, छगन भोगळे, निलेश देवकर, राजेंद्रकुमार देवकर, संतोष काळे, श्रीकांत देवकर, विजय खर्चे, पराग जाधव, रणजित निकम, रोहित गायकवाड, बिभीषण नलवडे, अतुल शिंगाडे, वसंत मोहोळकर, हरिश्चंद्र पारेकर, रत्नमाला पवार, सुमन व्यवहारे आणि अमोल जाधव यांचा समावेश आहे.

तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच सभासद आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सहकार्य केले. या सहकार्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement

“शेतकरी आणि कारखान्याचे हित हेच आमचे मुख्य ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि सभासदांचे आभार व्यक्त केले.

कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने इंदापूर तालुक्यातील सहकार क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून, या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :

.