For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्ले-बहाद्दरवाडी रस्ता बनला धोकादायक

10:20 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्ले बहाद्दरवाडी रस्ता बनला धोकादायक
Advertisement

लहान पुलावरील लोखंडी सळ्या आल्या बाहेर : निकृष्ट दर्जाचे काम : नागरिकातून संताप

Advertisement

वार्ताहर/किणये 

कर्ले-बहाद्दरवाडी तगोडीजवळील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या लहान पुलावरील रस्त्यावर लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. त्यामुळे येथील वाहतूक धोकादायक बनली आहे. गेल्या वर्षभरापासून रस्त्याची अशी अवस्था बनली आहे. तरीही प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्ले-बहाद्दरवाडी या मुख्य रस्त्याचा काही भाग खड्डेमय बनला आहे. कर्ले गावाकडे जाताना असलेल्या तगोडीच्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या ठिकाणी यापूर्वी अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. कर्ले,जानेवाडी व बहाद्दरवाडी गावातील दुचाकीस्वार या खड्ड्यांमध्ये पडून किरकोळ जखमी झाले आहेत.

Advertisement

कर्ले तगोडीजवळ रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ट

कर्ले, बहाद्दरवाडी, जानेवाडी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप, इनाम बडस, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, किणये, रणकुंडये, नावगे या भागातील वाहनधारकांची या रस्त्यावरून रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तीन वर्षापूर्वी कर्ले तगोडीजवळ रस्त्यावर लहान पूल बांधण्यात आले. हे पूल पश्चिमेकडून येणाऱ्या पाण्याचा निचरा पूर्वेकडे व्हावा. यासाठी हे लहान पूल निर्माण करण्यात आले. मात्र याचे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होवू लागल्या आहे. लहान पुलाचे कामकाज झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच त्या ठिकाणी खड्डे पडले. कर्ले गावातील ग्राम पंचायत सदस्य विनायक पाटील, वसंत सांबरेकर, बहाद्दरवाडी गावातील ग्राम. पं. सदस्य मल्लाप्पा पाटील यांच्या पुढाकारातून कर्लेतील नागरिकांनी श्रमदानाने खड्ड्यांमध्ये मुरूम, दगड व माती टाकून दुरूस्ती केली होती.

मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्ते दुरुस्त करा

पश्चिम भागातील या अनेक गावांमधील तरूण वर्ग उद्यमबाग व मच्छे औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमध्ये कामाला जातात. रात्री बारानंतर रात्रीची शिफ्ट करून कामगार वर्ग दुचाकीवरून आपल्या घरी जातात. पुलाजवळ रस्त्यावर लोखंडी सळ्या उघड्यावर पडल्या आहेत. मोठी दुर्घटना होण्याआधीच या रस्त्याची दुरूस्ती प्रशासनाने करावी अशी मागणी भागातील नागरिकांतून होत आहे.

लोखंडी सळ्यांमध्ये अडकले बसचे टायर 

कर्ले-बहाद्दरवाडी तगोडीजवळचा रस्ता वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरणारा बनला आहे. लहान पुलावरील रस्त्यावर लोखंडी सळ्या बाहेर पडल्या आहेत. तीन दिवसापूर्वी याच ठिकाणी लोखंडी सळ्यांमध्ये बसचे टायर अडकले होते. सुदैवाने दुर्घटना टळली. मात्र या ठिकाणचे कामकाज अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्राम पंचायत सदस्यांनी श्रमदाताने खड्डे बुजविले होते.

-नवनाथ खामकर, कर्ले

Advertisement
Tags :

.