For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karjat Land Sliding "कर्जतला दरड कोसळली" रेल्वे वाहतुकीचा खोळंबा, १६ गाड्या रद्द

06:55 PM Jul 06, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
karjat land sliding  कर्जतला दरड कोसळली  रेल्वे वाहतुकीचा खोळंबा  १६ गाड्या रद्द
Advertisement

गेल्या २४ तासांत राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले असून अनेक ठिकाणी नैसर्गिक भूस्खलन होऊन दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान कर्जत येथे दरड कोसळ्यामुळे पूणे - मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबली असून १७ गाड्या रद्द झाल्या आहेत. 

Advertisement

दरड कोसळ्याच्या या घटनेचा सर्वात मोठा प्रभाव मंकी हिल खंडाळा या ५ किलोमीटर परिसरावर झाला आहे. या दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने ३१ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत.

दरडी हटवण्याचे कार्य सुरु

Advertisement

दरम्यान या दुर्घटनेनंतर मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. या घटनेनंतर प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. त्यामुळे ८० हून अधिक कर्मचारी, आठ जेसीबींच्या साहाय्याने तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. रात्री उशिरा मुंबई-पुणे हा रेल्वेमार्ग सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

प्रवास न करण्याचे प्रशासनाचे आवाहन

दरम्यान, मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याच्या घटना आणि पूरसदृश परिस्थितीमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दोन्ही दिशेतील (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबविण्यात आली असून, नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे-मुंबई प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Tags :

.