For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजय दिवस

06:22 AM Jul 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजय दिवस
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटना, बेळगावच्यावतीने रविवारी कारगिल विजय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, युवा नेते राहुल जारकीहोळी, कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

देशसेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी शौर्य, समर्पण आणि जवानांच्या त्यागाची आठवण करून दिली. त्यांच्या बलिदानामुळेच आज देश सुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.