महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

करगाव सिंचन योजना पूर्णत्वास नेणार

10:57 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : चिकोडी तालुक्यातील करगाव सिंचन योजनेचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी मंगळवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे यासंबंधीची मागणी केली. चिकोडी तालुक्यातील करगाव सिंचन योजनेमुळे पंधरा गावांतील 8,390 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून या योजनेसाठी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात दोन नेत्यांनी आपला जीवही गमावला आहे. 567 कोटी रुपयांच्या या योजनेला 14 मार्च 2023 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सरकारच्या नव्या आदेशानुसार काम थांबले आहे. थांबलेले काम सुरू करण्याची मागणी दुर्योधन ऐहोळे यांनी केली. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अनुपस्थितीत परिवहन मंत्री रामलिंगा रे•ाr यांनी या प्रश्नावर उत्तर दिले. ही योजना प्रामुख्याने पूर्ण झाली पाहिजे, ही सरकारचीही इच्छा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

केबल कार सुरू करण्याचा विचार

Advertisement

सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर केबल कार सुरू करण्यासंदर्भात पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे, अशी माहिती कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सौंदत्तीसह आणखी काही ठिकाणी केबल कार सुरू करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article