For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पहिल्यांदाच धनुषसोबत जमणार करिनाची जोडी

06:22 AM Oct 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
पहिल्यांदाच धनुषसोबत जमणार करिनाची जोडी
Advertisement

करिना कपूर ही संजय लीला भंसाळी यांच्या पुढील चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. मिथ्रान यानेच यासंबंधी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष हा मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भंसाळी करणार असून लवकरच याचे चित्रिकरण सुरू होणार आहे. मिथ्रान यांनी अलिकडेच स्वत:चा ‘सरदार 2’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. करिना आणि धनुषसोबत नव्या चित्रपटासंबंधी बोलणी पार पडली आहे. त्यांच्या तारखा निश्चित झाल्यावर आम्ही चित्रिकरणाचे वेळापत्रक ठरवू असे मिथ्रान यांनी सांगितले आहे. हा चित्रपट एक मायथोलॉजिकल जंगल अॅडव्हेंचर धाटणीचा असणार आहे. या चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. तर मुख्य चित्रिकरण जानेवारीपासून सुरु होईल. या चित्रपटाद्वारे मिथ्रान हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. याचबरोबर करिना अन् धनुष पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसून येतील.  2000 सालच्या फॉलआउटनंतर संजय लीला भंसाळी आणि करिना कपूर पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसून येतील. 2000 च्या दशकात भंसाळी यांनी ‘देवदास’ चित्रपटासाठी करिनाशी संपर्क साधला होता. तर करिनाने याकरता स्क्रीन टेस्टही दिली होती. परंतु भंसाळी यांनी नंतर पारो या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनची निवड केली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.