For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करिना

06:26 AM Jun 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत करिना
Advertisement

सॅम बहादुर आणि राजी यासारखे उत्तम चित्रपट तयार करणारी दिग्दर्शिका मेघना गुलजार आगामी काळात ‘दायरा’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येणार आहे. या चित्रपटात करिना कपूर आणि पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाची पहिली झलक बीटीएस व्हिडिओच्या स्वरुपात सोशल मीडियावर समोर आली आहे.

Advertisement

अभिनेता पृथ्वीराज अन् करिना या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे समजते. दायरा हा एक सस्पेंसयुक्त थ्रिलरपट असून तो मर्डर मिस्ट्रीवर आधारित असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सुमारे 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर करिना कपूर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.  यापूर्वी ती ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नव्हते. दायरा या चित्रपटाद्वारे करिना प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.