प्रभासच्या चित्रपटात करिना कपूर झळकणार
कॅमियो भूमिकेत दिसून येणार
करिना कपूर लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. करिना ही प्रभासचा चित्रपट ‘द राजा साब’मध्ये दिसून येणार असल्याचे समजते. या चित्रपटात करिना ही स्पेशल डान्स नंबर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु यासंबंधी करिनाने अद्याप कुठलीच पुष्टी दिलेली नाही. या गाण्यात करिना आणि प्रभास एकत्र नृत्य करताना दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रभासने यापूर्वी करिनाचा पती सैफ अली खानसोबत ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम केले होते. तर द राजा साब या चित्रपटात प्रभाससोबत तीन नायिका दिसून येणार आहेत. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर करिनाचा डान्स नंबर चित्रपटात जोडण्याचा निर्णय अलिकडेच घेण्यात आला आहे.
द राजा साब चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवुड अभिनेता संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. करिनाने यापूर्वी अनेक आयटम डान्स नंबर्सद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटात नयनतारा देखील एका डान्स नंबरमध्ये कॅमियो करणार असल्याची चर्चा आहे.
द राजा साब चित्रपटात प्रभास, संजय दत्तसोबत मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार, जरीना वाहब, बोमन इराणी आणि योगी बाबू यासारखे दिग्गज कलाकार दिसून येणार आहेत.