For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भयपटात करिना

07:00 AM Aug 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
भयपटात करिना
Advertisement

44 वर्षीय करिना कपूर लवकरच स्वत:च्या आगामी चित्रपटात स्वत:पेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्यासोबत रोमान्स करताना दिसून येणार आहे. हा एक हॉरर चित्रपट असेल, ज्यात करिना भूताची भूमिका साकारणार आहे. करिनाला भूताच्या स्वरुपात सादर करणाऱ्या या अनोख्या कहाणीची पटकथा अत्यंत नवी असून या भूमिकेसाठी ती अत्यंत योग्य असल्याचे निर्मात्यांचे सांगणे आहे. या चित्रपटाची कहाणी हुसैन दलाल यांनी लिहिली आहे. या चित्रपटात करिना एका 20 वर्षे लहान अभिनेत्यासोबत काम करणार आहे. करिनाने अलिकडेच चित्रपटसृष्टीतील स्वत:च्या प्रवासाला 25 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्री लवकरच ‘दायरा’ चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार करत आहे. या क्राइम-ड्रामा थ्रिलर गुन्हेगारी, शिक्षा आणि न्यायाच्या शतकांपेक्षा जुन्या विरोधाभासाला दर्शविणारा असेल. मागील वर्षी करिना ही क्रू अणि सिंघम अगेन या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यातील एका चित्रपटात ती तब्बू आणि क्रीति सेनॉनसोबत मुख्य भूमिकेत होती. तर सिंघम अघेन या चित्रपटात अनेक कलाकार असल्याने तिच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.