For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

करिना अन् शाहरुखची पुन्हा जमणार जोडी

07:00 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
करिना अन् शाहरुखची पुन्हा जमणार जोडी
Advertisement

अभिनेता शाहरुख खानसोबत करिना कपूर सुमारे 15 वर्षांनी पुन्हा स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसून येणार आहे. अभिनेत्री शाहरुखचा आगामी अॅक्शन एंटरटेनर चित्रपट ‘किंग’मध्ये एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसून येणार आहे. करिना ही ‘डॅडी कूल’ नावाच्या गाण्यात सुपरस्टारसोबत नजरेस पडेल. करिना दक्षिण आफ्रिकेत शाहरुखसोबत या विशेष गाण्याचे चित्रिकरण करत आहे. तिने चित्रिकरणासाठी 5 दिवस दिले असून हे चित्रिकरण व्यापक स्तरावर केले जाणार आहे.  डॅडी कूलला अत्यंत खास गाणे म्हणून तयार केले जात असून यात शाहरुख आणि करिनाला अशा शैलीत एकत्र आणले जाईल, जे प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिले नव्हते. हे गाणे ‘किंग’ चित्रपटाच्या सर्वात मोठ्या वैशिष्ट्यापैकी एक असेल आणि निर्माते याकरता कुठलीच कसर ठेवत नसल्याचे समजते. या गाण्यात भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कलाकारही दिसून येतील. या गाण्याला सचिन-जिगर यांचे संगीत लाभणार आहे. शाहरुख आणि करिना यापूर्वी  ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘डॉन’ यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसून आले होते. तर 2011 साली प्रदर्शित ‘रा. वन’ या चित्रपटात त्यांची जोडी अखेरची दिसून आली होती. किंग या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. तर चित्रपटात शाहरुखसोबत सुहाना खान, दीपिका पदूकोन, अभिषेक बच्चन, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, राणी मुखर्जी, जयदीप अहलावत, अरशद वारसी आणि राघव जुयला दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.