For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करिना अन् सारा एका चित्रपटात

06:47 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
करिना अन् सारा एका चित्रपटात
Advertisement

रोहित शेट्टीचा चित्रपट ‘गोलमाल 5’वरून दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. रोहित शेट्टीने नव्या चित्रपटात करिना कपूर आणि सारा अली खान यांची निवड करणार आहे. तर कुणाल खेमू चित्रपटाचा क्रिएटिव्ह सल्लागार आहे. रोहितने करिना कपूर आणि सारा अली खान यांना ऑफर दिली असून दोन्ही अभिनेत्रींशी यासंबंधी बोलणी सुरू असल्याचे समजते.

Advertisement

रोहितसोबत सारा अली खानने यापूर्वी एका चित्रपटात काम केले आहे. तर करिना कपूर ही गोलमाल प्रेंचाइजीचा हिस्सा राहिली आहे. करिनाला पुन्हा या फ्रेंचाइजीत आणण्यासाठी रोहित उत्सुक आहे.  गोलमाल 5 चित्रपटात नवी ऊर्जा आणण्यासाठी रोहित शेट्टी हा युवा लेखकांच्या एका टीमसोबत एका कहाणीवर काम करत आहेत, ज्यात ‘गोलमाल अगेन’चा कलाकार कुणाल खेमू हा क्रिएटिव्ह सल्लागार म्हणून स्वत:चे योगदान देत आहे.

करिना कपूर यापूर्वीच अजय देवगणसोबत या फ्रेंचाइजीचा हिस्सा राहिली आहे. नव्या वर्षात गोलमाल 5 चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण करण्याचे नियोजन दिग्दर्शक अभिषेक पाठकने आखले आहे. गोलमाल रिटर्न्स (2008) आणि गोलमाल 3 (2010) मध्ये अजय देवगण आणि करिना यांची जोडी दिसून आली होती. तर साराने रोहित शेट्टीसोबत ‘सिम्बा’ चित्रपटात काम केले होते. तर गोलमाल 5 च्या निमित्ताने करिना आणि सारा पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.