हल्लेखोर वाळू चोरट्यांना महिला उपजिल्हाधिकारी यांची ‘कराटे कीक'
मोठ्या धाडसाने परतावून लावला वाळोरां हल्ला : पांढरा समुद्र किनाऱयावरील घटना, शहर पोलिसात दोघा अज्ञातांवर गुन्हा दाखल,अधिकाऱयांया सुरक्षितता पश्न ऐरणीवर, उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यों होतेय कौतुक
रत्नागिरी : येथील पांढरा समुद्रकिनारी वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (49) यांच्यावर फावड्याने हल्ला करण्या पयत्न केला. मात्र ‘त्या' अज्ञात दोघा हल्लेखोरांना श्रीमती गेडाम यांनी चांगला चोप दिला. आपल्या कराटे कौशल्याचां पळाईने वापर करत त्या या बाक्या पसंगाला अतिशय धाडसाने सामोरे गेल्या. कराटे कीकद्वारे हल्ला परतावून लावणाऱया गेडाम यों सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु वाळू माफियांनी केलेल्या या हल्ल्यामुळे आता अधिकाऱयांया सुरक्षितता पश्न ऐरणीवर आला आहे.हर्षलता गेडाम या मार्शल आर्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत.
उपजिल्हाधिकारी श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघा अक्ज्ञातांवाद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडळ अधिकाऱयांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता धनराज गेडाम या कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास त्या रेमंड रेस्टहाऊसच्या मागील बाजूला असलेल्या मागवाडाöपांढरा समुद्र किनाऱयावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. किनाऱयावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या. याचवेळी पांढरा समुद्र येथे 2 सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या वाळू भरून जात होत्या. तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकरवाड्याच्या दिशेने उभा होता. त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.
अधिकाऱयीं सुरक्षितता ऐरणीवर
श्रीमती हर्षलता गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंवि कलम 352, 34 नुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. पांढऱया समुद्रकिनारी खुलेआम वाळूची चोरी करणाऱया व्यक्तींनी थेट उपजिल्हाधिकाऱयांवरच हल्ला केल्याने वाळू चोरट्यांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांसह महसूल यंत्रणेच्या आशिर्वादानेच वाळू चोरी सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता उपजिल्हाधिकाऱयांवर हल्ला केल्यामुळे महसूल यंत्रणा काय करतेय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेडाम मार्शल आर्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट
हर्षलता गेडाम या मार्शल आर्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी फिल्ड आाा&र असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. तसा 2000 साली झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतदेखील त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. राज्यस्तरीय कीडा स्पर्धेत त्यांनी 2000 ते 2004 या कालावधीत त्यांनी मैदानी खेळात सर्वोत्कृष्ट खेळाडु म्हणून त्यां गौरव करण्यात आला होता.