Kolhapur News : टीईटी पेपरफुटी प्रकरणात कराडचा अविनाश कणसे अटक
कराडचे अविनाश कणसे तीन दिवस कोठडीत
कोल्हापूर : टीईटी पेपर फुटी प्रकरणी कराड तालुक्यातील अविनाश पांडुरंग कणसे रा. शेणोली (जि. सातारा) याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या २१ वर गेली आहे. आरोपीला कागलच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पी. एस. पाटील यांच्यासमोर उभे केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली.
टीईटी पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोपींच्या संख्येतही वाढ होत आहे. आरोपीची संख्या एकूण २६ आहे. त्यापैकी २० आरोपींना यापूर्वी अटक झाली आहे. आज २१ वा आरोपी अविनाश कणसे यास कराड येथून आज पोलिसांनी अटक केली.
टीईटी पेपर फुटी प्रकरण गंभीर बनले आहे. या प्रकरणाचे थेट कनेक्शन बिहार असल्याचे समजते. बिहारमधील रितेश व हुसेन हे प्रमुख दोन आरोपी असून पोलीस पथके त्यांच्या शोधात आहेत. तर या प्रकरणाचे उपकेंद्र कराड असून कराडचा महेश गायकवाड या प्रकरणाचा म्होरक्या आहे तर त्याचा भाऊ संदीप गायकवाड हा प्रमुख आरोपी आहे.
दरम्यान, अविनाश कणसे यास दि ३ डिसेबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. या प्रकरणाचा तपासासंदर्भात माहिती घेण्यासाठी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी धीरजकुमार यांनी मुरगूड पोलीस ठाण्याला भेट दिली व माहिती घेतली