For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News | कराड हादरले! स्विफ्ट कारमधून आले अन् मिनिटांत ३१ लाखांचे ११५ मोबाईल लांबवले

05:18 PM Aug 23, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   कराड हादरले  स्विफ्ट कारमधून आले अन् मिनिटांत ३१ लाखांचे ११५ मोबाईल लांबवले
Advertisement

कराड -शॉपीचे शटर मधोमध उचकटून चोरट्यांनी तब्बल ३१ लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे महागडे ११५ मोबाईल लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अडीचच्या सुमारास स्विफ्ट कारमधून तीन संशयित एस.एस. मोबाईल शॉपीजवळ आले. दुकानाच्या परिसराची पाहणी केल्यानंतर त्यांनी शटरचे कुलूप व मधला भाग उचकटून दुकानात प्रवेश केला. मोबाईल घेऊन काही वेळातच ते दुकानाबाहेर आले.

Advertisement

शहरातील मोहिते हॉस्पिटलजवळअसलेल्या एस. एस. मोबाईल कराड फोडलेल्या मोबाईल शॉपीचा आणि स्विफ्ट कारमध्ये बसून भेदा चौकाच्या दिशेने पसार झाले. चोरीला गेलेल्या मोबाईलची प्राथमिक किंमतसुमारे ३१ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असताशटर उचकटलेले आणि दुकानातील मोबाईल गायब असल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस उपनिरीक्षक विजय गोडसे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास तातडीने सुरुवात केली. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत पोलिस पथकाने घटनास्थळ व आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

Advertisement

Advertisement
Tags :

.