Karad News | आजोबांच्या डोळ्यादेखत कोयना नदीने हिरावला नातू; मुलासमोरच वडिलांचा मृत्यू
कराड -कराड पावसाळ्याच्या तोंडावर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या दुर्घटनांनी हळहळ व्यक्त होत आहे. सुपने येथील कोयना नदीत आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला तर हजारमाची येथे मुलासमोरच विहिरीत बुडाल्याने ४५ वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या या दोन घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
आजोबांच्या डोळ्यादेखत नदीने हिरावला नातू
सुपने-किरपे पुलादरम्यान वाहणाऱ्या कोयना नदीच्या पात्रात गुरुवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. वरद शंकर कांबळे (वय १२) हा आपल्या आजोबा बंडू खाशाबा कांबळे यांच्यासोबत पोहण्यासाठी नदीकाठी गेला होता. यावेळी आजोबा नदीकाठावर बसलेले असताना बरद पाण्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.
पुलावरून जाणाऱ्या एका नागरिकाच्या हा प्रकार लक्षात येताच त्याने आरडाओरडा मदतीसाठी मदतीसाठी हाक पोहत असलेले युवक आणि करत मारली. आवाज ऐकून नदीत मात्र मदत मिळण्यापूर्वीच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. बरद खोल पाण्यात गेला. आपल्या डोळ्यादेखत नातू पाण्यात अदृश्य होताना पाहून आजोबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. सुपने गावचे पोलीस कमलेश कोळी यांनी स्वतः नदीत उडी घेत शोधकार्य केले. त्यांच्यासह जमीर शौकत, लखन पठाण, अमोल पाटील आणि अन्य युवकांनी शोधमोहीम राबवली. काही वेळानंतर वरदचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
मुलासमोरच विहिरीत बुडाले वडील दुसरी घटना हजारमाची येथे घडली. युबराज राजाराम कांबळे (वय ४५) हे आपल्या मुलगा प्रणय याच्यासोबत पोहण्यासाठी लालासो भिमराव सुर्वे यांच्या चिकू बागेतील विहिरीवर गेले होते. दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास पोहत असताना ते विहिरीत बुडाले. घटनेनंतर प्रणय घाबरलेल्या अवस्थेत घरी धावत आला आणि वडील विहिरीत बुडाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर नातेवाईक, ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने युबराज
कांबळे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.याप्रकरणी त्यांचे बंधू सचिन कांबळे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
कोयना नदी व परिसरातील जलाशयांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्याघटनांचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी कोयना धरण परिसरात दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निसरे बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलाचा बळी गेला. आता सुपने येथील बरद कांबळेसह हजारमाचीतील मृत्यूने सहा दिवसांत बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.