Satara News : सेवारस्ता बनलाय मृत्यूचा सापळा
11:59 AM Jun 08, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सेवारस्त्यात प्रचंड खड्डे : रस्ता उखडल्याने अपघाताचा धोका
कराड: सध्या पुणे-बंगळूरू आशियाई महामार्गाच्या विस्तारीकरणांतर्गत कराड शहरानजीक कोल्हापूर नाका ते नांदलापूर व गोटे गावच्या हद्दीत उड्डाण व भराव पूल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून कराड शहराच्या दोन्ही बाजूला महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळवण्यात आली आहे. मात्र सेवारस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गोटे गावच्या हद्दीत फर्न हॉटेलसमोरही पुलाचे काम सुरू असल्याने अनेक दिवसांपासून महामार्गाची वाहतूक सेवारस्त्यावरून सुरू आहे.
मात्र येथील सेवारस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे आकाराने मोठे असल्याने प्रचंड त्रास सेवारस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांना होतोय. वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय महामार्ग प्रशासनाने सेवारस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
वाहनांचे नुकसान होत आहे. लहान-मोठे अपघातही होत आहेत. तसेच येथील रस्त्यावर ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार पडण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग प्रशासन व ठेकेदाराने तातडीने सेवारस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक गोटे गावच्या हद्दीत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्याने वळवली आहे. मात्र येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने रस्त्यात चढ-उतार निर्माण झाले आहेत. परिणामी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याचा वाहतूक कोंडीवरही परिणाम होत आहे.
Advertisement
Advertisement