For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Karad News | प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर कराड पोलीस ॲक्शन मोडमध्ये; शहरात डंपर आणि ट्रकना प्रवेशबंदी

01:45 PM Apr 19, 2026 IST | NEETA POTDAR
karad news   प्राध्यापिकेच्या मृत्यूनंतर कराड पोलीस ॲक्शन मोडमध्ये  शहरात डंपर आणि ट्रकना प्रवेशबंदी
Advertisement

                                    कराडमध्ये जड वाहनांना चाप!

Advertisement

कराड: काही दिवसांपूर्वी वर्दळीच्याठिकाणी झालेल्या दुर्दैवी अपघातात एका प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कराड वाहतूक पोलीस प्रशासनाने गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर व ट्रकांवर वर्दळीच्या वेळेत शहरात प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कराड पोलिसांच्या निर्णयानुसार सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या कालावधीत शहराच्या हद्दीत डंपर व ट्रकांना प्रवेश दिला जाणार नाही. या वेळेत डंपर किंवा गौण खनिज वाहतूक करणारी वाहने आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. पंधरा दिवसांपुर्वी गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने एका प्राध्यापिका महिलेला धडक देऊन चिरडले होते. अपघातात महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. विशेषतः वर्दळीच्या वेळेत भरधाव वेगाने धावणारे डंपर, क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन याकारणांमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची तक्रार केली जात होती.
डंपर चालकांकडून अनेकदा वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटण्याच्या घटना घडतात.

Advertisement

त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Advertisement
Tags :

.