For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : कराड पालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 

04:57 PM Jun 11, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   कराड पालिकेत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 
Advertisement
                              अहिरे येथे अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा नोंदवला निषेध
Advertisement

कराड: गडचिरोली जिल्ह्यामधील अहिरे नगरपंचायतमधील अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ कराड नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करून या घटनेचा निषेध केला. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. अहेरी नगरपंचायतीत अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या नगरपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय अधिकारी व कर्मचारी हे कायद्याने सोपविलेली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
अशा घटना लोकशाही व्यवस्थेसह प्रशासकीय कार्यक्षमतेलाही बाधा आणणाऱ्या आहेत. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण देण्याबरोबरच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
Advertisement
Tags :

.