कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कराड बसस्थानक पुणे विभागात तृतीय

05:56 PM Jul 15, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कराड :

Advertisement

एस. टी. महामंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान २०२५ च्या पहिल्या सर्वेक्षण फेरीत कराड बसस्थानकाने पुणे विभागात अ वर्गात तृतीय क्रमांक पटकावला आहे. या फेरीत कमी गुण मिळालेल्या घटकात अधिक परिश्रम घेऊन सुधारणा करून पुढील सर्वेक्षणात कराड बसस्थानक प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार आगार व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत गतवर्षी झालेल्या सर्वेक्षणात कराड आगार ब वर्गात गणले गेल्याने कराड बसस्थानकाला पुणे विभागात तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. वास्तविक कराड बसस्थानक हे कोकण व घाटमाथ्याला जोडणारे व कोल्हापूर पुणे मार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक आहे. कराड बसस्थानकातून दररोज हजारपेक्षा जास्त बसफेऱ्या सुटतात यात निव्वळ कराड आगाराच्या जवळपास सातशे फेऱ्यांचा सामावेश आहे. दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशांची ये-जा असलेल्या कराड बसस्थानकाचा आवारही मोठा आहे. कराडच्या एस. टी. प्रशासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत बसस्थानकातील व्यवस्थापन, प्रसाधनगृह व हरीत बसस्थानकाच्या दृष्टीने मोठे काम केले आहे. बसस्थानकाच्या आवारात आकर्षक रंगरंगोटी, सेल्फी पॉईंट, सजावट, ठिकठिकाणी फुलझाडांच्या कुंडया, दैनंदिन आवाराची साफसफाई व प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्यात येत आहे.

गरज आहे. बसस्थानकातील महत्वाच्या सुधारणा व सुशोभीकरणासाठी निधीची उपलब्धता होणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून व काही समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही सुविधांसाठी लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून पुणे विभागात अ वर्गात बारामती बसस्थानकाने प्रथम व इचलकरंजी बसस्थानकाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर कराड आगाराला तृतीय क्रमांक मिळाला आहे. वास्तविक बसस्थानाकाला लोकप्रतिनिधींचा वरदहस्त लाभण्याची देण्याची मागणी होत आहे.

२०२५ च्या पहिल्या सर्वेक्षण फेरीत कराड बसस्थानाकाला पुणे विभागात तृतीय क्रमांक मिळाला आहे. आजून तीन फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे या फेरीत ज्या घटकात कमी गुण मिळाले आहेत. त्या घटकाच्या सुधारणांसाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील. पुढच्या फेऱ्यांत कुठल्याही परिस्थितीत कराड बसस्थानकाला प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण ताकतीने काम करणार आहे.

                                                                                                               - शर्मिष्ठा पोळ-आगार व्यवस्थापिका

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article