कपूर कुटुंबियांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
दिल्ली
हिंदी सिनेसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ती कपूर कुटुंबातील सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी करिष्मा कपूर, करिना कपूर, सैफ अली खान, नीतू कपूर, रणबीर कपूर, आलिया भट, रिद्धिमा कपूर - साहनी यांच्यासह इतर कुटुंबातील सदस्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या प्रसंगी आपल्या आजोबांचे असामान्य जीवन आणि त्याच्या स्मरणार्थ या भेटीसाठी आमंत्रित केल्याबद्दल करिना कपूर खान हिने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ही कपूर कुटुंबियांची चौकशी केली.
या भेटीचे फोटोग्राफ आणि पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेला खास व्हीडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कपूर कुटुंबियांसोबत पंतप्रधान मोदी दिलखुलासपणे संवाद साधताना दिसत आहेत. या भेटीचे काही खास क्षण करिना कपूर, आलिया भट आदी कुटुंबियांनी त्यांच्या सोशलमिडीयावर शेअर केले आहेत.
या भेटीतील एक प्रसंग
पंतप्रधान मोदींना कोणत्या नावाने हाक मारायची, यावरून कपूर कुटुंबियांच्या तारांबळ उडाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणायचं की आणखी काय.... असे रणबीर कपूरने व्हीडीओमध्ये बोलताना दिसले. तर याप्रसंगी रणबीरची आत्या पंतप्रधान मोदींचे नाव घेताना अडखळ्याने वातावरण गंभीर झाल्याचे या व्हिडीओ दिसले. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी 'कट' असे म्हटल्याने तेथे सगळीकडे हशा पसरली. असे त्या व्हिडीओतून दिसते.