For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कपिलदेवकडून प्रणवी अर्सचे कौतुक

06:16 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
कपिलदेवकडून प्रणवी अर्सचे कौतुक
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फ या क्रीडा प्रकारात भारताची महिला गोल्फपटू प्रणवी अर्सने सुवर्णपदक मिळवून नवा इतिहास घडविला. तसेच या स्पर्धेत भारताच्या महिला गोल्फ संघाने सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळविले. अखिल भारतीय व्यवसायिक गोल्फ टूर संघटनेचे अध्यक्ष तसेच भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी प्रणवी अर्स, आदिती अशोक, दिक्षा डागर यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

23 वर्षीय म्हैसूरच्या प्रणवी अर्सने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात गोल्फ क्रीडा प्रकारात वैयक्तीक सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू ठरली आहे. तिने अंतिम सामन्यात चीनच्या रुओनिंगचा पराभव केला. 2002 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष विभागात भारताच्या शिवकपूरने सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला होता. जपानमधील आशियाई स्पर्धेत महिलांच्या सांघिक गोल्फ प्रकारामध्ये चीनने सुवर्णपदक तर भारताने रौप्यपदक मिळविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.