‘कांतारा चॅप्टर 1’ला मिळाली नायिका
ऋषभ शेट्टीचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कांतारा चॅप्टर 1’ वरून दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहे. ऋषभ काही काळापासून याचे चित्रिकरण करत असून आता या चित्रपटाच्या टीममध्ये रुक्मिणी वसंत सामील झाली आहे. होम्बले फिल्म्सने रुक्मिणी वसंतची भूमिका ‘कनकवती’चा पहिला लुक प्रदर्शित करत प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. पोस्टरमध्ये रुक्मिणी भारतीय पोशाख अन् दागिने परिधान करून असल्याचे दिसून येते. ती एका महालाच्या आत उभी असल्याचे पोस्टरमध्ये दाखविण्यात आले आहे.
रुक्मिणी या चित्रपटात कनकवती ही भूमिका साकारत आहे. कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘कांतारा चॅप्टर 1’ या चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शन ऋषभने पेले आहे. अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 2022 मधील ब्लॉकबस्टर कांताराचा प्रीक्वेल आहे. यापूर्वी कांतारा चॅप्टर 1 मधील ऋषभचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला होता. आता रुक्मिणी वसंतचा कनकवतीच्या रुपातील फर्स्ट लुक सादर केल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढलीआहे. या चित्रपटाला बी. अजनिश लोकनाथ यांचे संगीत लाभले आहे. हा चित्रपट कन्नड, तेलगू, हिंदी, तमिळ, मल्याळी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.