महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शुक्रवारीही फलकांवर कन्नडसक्ती सुरूच

10:31 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयुक्त स्वत: उतरले रस्त्यावर : शुक्रवारी तब्बल 500 हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा : व्यावसायिकांतून तीव्र नाराजी

Advertisement

बेळगाव : शहरातील आस्थापनांच्या फलकांवरील 60 टक्के कन्नडसक्ती करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी सरसावले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी जाऊन व्यावसायिकांना नोटिसांबरोबरच सूचनाही केल्या आहेत. शुक्रवारी मध्यवर्ती बसस्थानक, फोर्ट रोड, पाटील गल्ली, शनिमंदिर परिसरात जाऊन दुकानदारांना फलकांवर कन्नडचा उल्लेख करावा, अशी सूचना केली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश स्वत: व्यावसायिकांना सूचना करत होते. इतर समस्यांकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले असून त्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. बुधवारी शहरातील तब्बल 1296 आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी तब्बल 500 हून अधिक व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे व्यावसायिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरामध्ये इतर समस्या भेडसावत असताना केवळ कन्नडचा अट्टाहास करण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामाला लागले आहेत. शहरातील विविध भागांमध्ये फिरून कन्नडसक्ती करण्यात येत आहे. आस्थापनांच्या फलकांवर इंग्रजी, तसेच मराठीमध्ये उल्लेख असेल तर ते फलक देखील काढण्याचा प्रताप महानगरपालिकेचे कर्मचारी करत आहेत. तुम्हाला आम्ही नोटीस दिली आहे, फलकांवरील 60 टक्के जागेमध्ये कन्नडमध्ये लिहिणे बंधनकारक आहे. उर्वरित 40 टक्क्यांमध्ये तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये लिहा, त्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, असे सांगण्यात येत आहे. शहरामध्ये मराठी भाषिकच मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे व्यावसायिक मराठी भाषेमध्येच फलकांवर लिहित आहेत. मात्र पोटशुळ उठलेल्या कन्नड दुराभिमान्यांनी ही दडपशाही सुरू केली असून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी होत आहे. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. संजीव नांद्रे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article