For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मराठी भाषिकांच्या एकीमुळे कन्नड संघटना बिथरल्या

07:03 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठी भाषिकांच्या एकीमुळे कन्नड संघटना बिथरल्या
Advertisement

...म्हणे फेरीत सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या काळ्यादिनाच्या फेरीला यावर्षी अलोट प्रतिसाद मिळाला. युवकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे कन्नड संघटना बिथरल्या आहेत. सायकल फेरीत सहभागी झालेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. कितीही प्रयत्न केले तरी मराठी भाषिकांची एकी अधिकच मजबूत होत असल्याने कन्नड संघटनांच्या कुरापती सुरू झाल्या आहेत.

Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांनी काळ्यादिनाच्या फेरीवरून मराठी भाषिकांना डिवचताच यावर्षी फेरीमध्ये हजारोंची उपस्थिती दिसून आली. विशेष म्हणजे तरुणाईचा मिळालेला प्रतिसाद हा अनेकांच्या डोळ्यांमध्ये खुपू लागला आहे. यावर्षीच्या फेरीची केवळ कन्नड संघटनाच नाही तर राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे संघटनांकडून कोल्हेकुई सुरू झाली आहे.

मंगळवारी एका कन्नड संघटनेच्या म्होरक्याने माध्यमांसमोर बोलताना मराठी भाषिकांवर गरळ ओकली. परवानगी नसताना फेरी काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कितीही प्रयत्न केले तरी मराठी भाषिकांची एकी अबाधित असल्याने त्यांच्याही पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

आता तरी शहाणपण येणार का?

एकीकडे कन्नड संघटनांच्या अरेरावीमुळे कर्नाटकातील अनेक आयटी कंपन्यांनी इतर राज्यांमध्ये स्थलांतर केले आहे. असे असतानाही आयटी कंपन्यांमध्ये कन्नड भाषिकांना नोकऱ्या द्या, अन्यथा या कंपन्या बंद पाडू, असा इशारा मंगळवारी संघटनेने दिला. परंतु या अरेरावीमुळे अनेक उद्योग बाहेर चालले असल्याने आता तरी या संघटना व त्यांच्या म्होरक्यांना शहाणपण येणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Advertisement
Tags :

.