For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मराठी फलकांवर कन्नड संघटनांची वक्रदृष्टी

06:34 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठी फलकांवर कन्नड संघटनांची वक्रदृष्टी
Advertisement

रिक्षा स्टँडच्या फलकावर आक्षेप

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

एकीकडे राज्योत्सवाचा उन्माद सुरू असताना दुसरीकडे मराठी फलकांना लक्ष्य केले जात आहे. एरव्ही नागरिकांच्या समस्यांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या बेळगाव महानगरपालिकेने मराठी फलक हटविण्यासाठी तत्परता दाखवली आहे. हीच तत्परता कामाच्या बाबतीत दाखवली असती तर बेळगाव महानगरपालिका देशात अव्वल ठरली असती, अशा प्रतिक्रिया मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहेत.

Advertisement

फेसबुकवरील एका रिकामटेकड्या संघटनेने शहरातील मराठीत लिहिलेल्या रिक्षा स्टँडचा फलक समाजमाध्यमावर घातला. म्हणे 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात कानडी भाषिक बेळगावमध्ये येणार असल्याने असे फलक दिसू नयेत, असा इशारा महानगरपालिकेला देण्यात आला होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी हा फलक झाकल्याचे दिसून आले. सरकारी कार्यालये, आस्थापनांपाठोपाठ आता रिक्षा स्टँडच्या फलकांवरही या संघटनांची वक्रदृष्टी आहे.

मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी बेळगावमध्ये सरकारी पैशांवर राज्योत्सव साजरा केला जातो. बेळगावच्या स्थानिक कानडी भाषिकांना याबाबत काहीच देणे-घेणे नसते. त्यामुळे गर्दी करण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून मोफत बस सुविधा उपलब्ध करून टवाळखोर युवकांना शहरात आणले जाते. अशा टवाळखोरांकडून दरवर्षी उन्माद सुरू असतो. परंतु या सर्वात मराठी फलकांना मुद्दामहून लक्ष्य केले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून बेळगाव शहरातील रिक्षा स्टँडचे फलक हे मराठीतून आहेत. परंतु त्यावरही आता कन्नड संघटना आक्षेप घेत आहेत. अशा प्रकारांनी भाषिकवाद अधिकच उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडणार

Advertisement
Tags :

.