For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

57 लाखांच्या केबल चोरीचा काही तासांत छडा; राजस्थान-हरियाणातील तिघे ताब्यात; ओसरगाव-गवळवाडीतील चोरीप्रकरणी एलसीबीची कारवाई

05:46 PM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
57 लाखांच्या केबल चोरीचा काही तासांत छडा  राजस्थान हरियाणातील तिघे ताब्यात  ओसरगाव गवळवाडीतील चोरीप्रकरणी एलसीबीची कारवाई
Advertisement
कणकवली / वार्ताहर : ओसरगाव-गवळवाडी येथे 57 लाख 40 हजार 995 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम लाईट केबल चोरीप्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत छडा लावला. या कारवाईत राजस्थान आणि हरियाणा राज्यातील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या केबलची पॅकिंगसह पाच बंडले आणि वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

3 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत ओसरगाव-गवळवाडी येथे ही चोरी झाली होती. याप्रकरणी 5 नोव्हेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला.

Advertisement

पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. या तपासात इरशाद खुर्शीद खान (वय 32), आरिफ खुर्शीद खान (वय 30) आणि शाहीद खुर्शीद खान (वय 24) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे संशयित राजस्थान आणि हरियाणा राज्यातील आहेत.

पोलिसांनी संशयितांकडून चोरीस गेलेली केबलची पॅकिंगसह पाच बंडले आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने हस्तगत केली आहेत. तिन्ही संशयितांना पुढील तपासासाठी कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

Advertisement

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवान तपास करीत मोठ्या रकमेच्या केबल चोरीचा छडा लावल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.