For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘सेवा की कहानी’ अभियानात कणकवली शहर मंडळ राज्यात प्रथम; मिलिंद मेस्त्री यांचा प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते सत्कार

11:28 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सेवा की कहानी’ अभियानात कणकवली शहर मंडळ राज्यात प्रथम   मिलिंद मेस्त्री यांचा प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते सत्कार
Advertisement
कणकवली / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित ‘सेवा की कहानी’ कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्याच्या उपक्रमात कणकवली मंडळाने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्दल कणकवली मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सेवा संकल्प अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्याच्या उपक्रमात कणकवली मंडळाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे मंडळाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल पक्षाच्या वतीने यशस्वी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

Advertisement

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध अभियानांची माहिती दिली. अभियानाचे सहसंयोजक आणि सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचेही या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाला युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, निसार शेख, मंडळ उपाध्यक्ष संदीप सावंत, सरपंच सचिन पारधिये, अजित पवार, सुशील कदम, पपू पुजारे, सुधीर सावंत, बाबजी चव्हाण, भगवान दळवी, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, अमोल रासम, कीर्तीकुमार राणे, सुभाष मालंडकर, प्रशांत राणे, नितीन राणे, विश्वरूप लाड आणि किशोर राणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.