महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी बुद्रुक चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्लीतील काँक्रिट गटारीचे काम युद्धपातळीवर

10:27 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

Advertisement

येथील सरकारी कन्नड हायस्कूलपासून चव्हाट गल्ली, लक्ष्मी गल्लीतून गावाजवळील तलावापर्यंतच्या काँक्रिट गटारी कामाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदर गटारीचे काम चव्हाट गल्लीतून दोन्ही बाजूनेही होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर काँक्रिट गटार कामासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून 1 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले. गावच्या पूर्वेला व दक्षिणेला नवीन वसाहतीचा विस्तार होत आहे. पावसाळ्यातील व रोजच्या वापराचे पाणी सर्व बाजूकडून चव्हाट गल्लीतील याच गटारीतून लक्ष्मी गल्लीतील गटारीतून गावाजवळील तलावाच्या बाजूने असलेल्या कालव्याला मिळून मार्कंडेय नदीला मिळत होते. परंतु सदर गटारीची रुंदी कमी असल्यामुळे पावसाळ्याचे पाणी गटारी भरून लक्ष्मी गल्लीतील अनेक घरांत जाऊन नागरिकांना त्रास सोसावा लागत होता. सध्या गटारीची रुंदी व खोली वाढवल्यामुळे ही सारी चिंता मिटणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मार्कंडेय नदीपर्यंत गटारी बांधण्याची मागणी

चव्हाट गल्लीतील दोन्ही बाजूच्या गटारींची रुंदी व खोली वाढवल्यामुळे गावच्या पूर्व दिशेला नवीन वसाहतीमधील नागरिकांचे रोजचे सांडपाणी व पावसाळ्यातील पाणी याच गटारीतून जाणार आहे. गावाजवळील तलावापुढील कालवा शिवारातून गेलेला आहे. सर्व सांडपाणी तसेच पावसाचेही पाणी याच कच्च्या कालव्यातून जाणार आहे. यामुळे पाण्याच्या मोठ्या लोंढ्यामुळे शिवारातील कालवा फुटून शेतीचे नुकसान होण्याची भीती नाकारता येत नाही. तेव्हा मार्कंडेय नदीपर्यंत सदर कालव्याचे काँक्रिटीकरण करून सोडल्यास शेतकऱ्यांना धोका होणार नाही, अशीही मागणी येथील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article