कांगारूंची सरशी..
ऑस्ट्रेलिया महिला खेळाडूंनी जिगरबाज खेळ करून विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मोठ्या दिमाखाने ंप्रवेश केला. अ गटात 10 गुण मिळवून ऑस्ट्रेलिया महिला संघ अपराजित राहिला. अर्थातच भारतीय संघ स्पर्धेतून बाद झाला.
ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वास्तविक भारताने 170 धावा रचून कांगारुंसमोर चांगले आव्हान ठेवले होते. कर्णधार हरमनप्रीत कौरने 3 षटकार आणि 6 चौकार ठोकून 56 धावांची बहारदार खेळी केली. स्मृती (38), शेफाली वर्मा ( 34), जेमिमा (34) यांनी यथोचित साथ दिली.
भारताने ऑस्ट्रेलियाचे 3 खेळाडू 68 धावात टिपले होते. परंतु एलीस पेरी आणि गार्डनर या जोडीने सामना अक्षरश: खेचून घेतला. पेरीने 56 आणि गार्डनरने 53 धावांची झंझावाती खेळी करून संघास विजय मिळवून दिला. भारताची भरवशाची फलंदाज स्मृती मानधना हकनाक धावबाद झाली. तसेच भारतीय गोलंदाज आक्रमक आणि भेदक मारा करण्यात अयशस्वी ठरल्याने संघ अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. रेणुका सिंगने निर्धारित 4 षटकात 41, श्रीचरणीने 32 आणि दीप्ती शर्माने 31 धावा बहाल केल्या. यावरूनच पराभवाचे चित्र स्पष्ट होत आहे.
योगायोगाने भारतीय पुरुष संघ याच दिवशी आयर्लंडच्या कमकुवत संघाकडून पराजित झाला आणि टी मालिका 0-2 गमावून बसल्याचे चित्र पाहायला मिळाले 30 जून रोजी ऑस्ट्रेलिया आणी वेस्ट इंडिज हा उपांत्य फेरीचा सामना लंडन येथील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर होईल.