For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंगनाच्या 'इमर्जन्सी' चे प्रदर्शन थांबविले

01:28 PM Jan 17, 2025 IST | Pooja Marathe
कंगनाच्या  इमर्जन्सी  चे प्रदर्शन थांबविले
Advertisement

सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध 

Advertisement

अभिनेत्री खासदार कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा सिनेमा आज (दि. १७) प्रदर्शित झाला आहे. पंजाबमध्ये मात्र या सिनेमाच्या प्रदर्शन थांबविण्यात आले आहे. या सिनेमाला पंजाबमधून कडाडून निषेध करण्यात आलेला आहे. दरम्यान याचे प्रदर्शन थांबवून पंजाबमध्ये सिनेमा निषेध केला जात आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) असे सांगितले आहे, की ते "इमर्जन्सी" या सिनेमाचा निषेध करतात. या सिनेमामध्ये शीख धर्माचा इतिहास आणि १९८४ च्या इतिहासातील घटना या चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत. म्हणून या सिनेमाचा पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात येत आहे. या चित्रपटामुळे देशातील बंधुभावाला इजा पोहोचली असल्याचा ही आरोप राज्य नेत्यांनी केला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाविरुद्ध आज (दि. १७) राज्यव्यापी निदर्शने ही करण्यात आली आहेत.


यावर पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख अमरिदर सिंग राजा वारिग म्हणाले की , सरकारने व सेन्सॉर बोर्डाने इमर्जन्सी सारख्या सिनेमांवर लक्ष ठेवायला हवे. या सिनेमाच्या पटकथांमधील संदर्भामध्ये किती तथ्य आहे पडताळून पाहीले पाहिजे. या सिनेमाद्वारे दाखवण्यात आलेल्या अनेक घटना या खऱ्या नसून मसाला वाढवण्यातसाठी त्यांचे विकृतीकरण केलेले आहे.
मोहाली झिरकापूर येथील ढिल्लन प्लाझा आणि कॉस्मो प्लाझा येथील चित्रपटगृहांच्या बाहेर सिंधुपूरमधील शेतकरी गटांचे नेते जमावाने उभे आहेत. पंजाबमध्ये सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान अभिनेत्री खासदार कंगणा राणौत यांनी अश्लिल भाषा वापरली आहे, असे यांचे म्हणणे आहे. लुधियाना, भटिंडा आणि जालंधर येथेही या विरुद्ध निदर्शने झाल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.