For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्वीन 2’द्वारे भेटीला येणार कंगना

06:49 AM Jul 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘क्वीन 2’द्वारे भेटीला येणार कंगना
Advertisement

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत कुठल्या न कुठल्या कारणाने सदैव चर्चेत असते. सध्या ती स्वत:च्या आगामी चित्रपटावरून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अलिकडेच प्रदर्शित ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. आता तिने स्वत:च्या पुढील चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले आहे.

Advertisement

कंगना पुढील काळात अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सर्वाधिक प्रतीक्षा ही तिच्या ‘क्वीन 2’ चित्रपटाची केली जात आहे. सुमारे 13 वर्षांनी क्वीन या चित्रपटाचा सीक्वेल निर्माण केला जात आहे. कंगनाने चित्रिकरण संपल्यावर आनंद व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना ही दिग्दर्शक विकास बहलसोबत दिसून येत आहे.

क्वीन 2 हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. तर क्वीन हा चित्रपट 2013 रोजी प्रदर्शित झाला होता आणि याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. कंगना सध्या अभिनेता आर. माधवनसोबत ‘तनु वेड्स मनु 3’ चित्रपटात काम करणार आहे. याचे चित्रिकरण पुढील काळात सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.