कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंगना रनौतच्या नव्या चित्रपटाची घोषणा

06:51 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंगना रनौत सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘इमरजेन्सी’वरून चर्चेत आहे. या चित्रपटाला काही जणांकडून विरोध देखील होत आहे. याचदरम्यान कंगनाच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. कंगना आता मोठ्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसून येणार आहे. खासदार म्हणून निवडून आलेल्या कंगनासाठी इमरजेन्सी हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Advertisement

Advertisement

या चित्रपटाला अलिकडेच सेन्सार प्रमाणपत्र मिळाले असल्याने तो प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाच्या वादादरम्यान कंगनाच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्याने चाहते खूश झाले आहेत. या नव्या चित्रपटाचे नाव भारत भाग्य विधाता असणार आहे. अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि निर्मात्यासोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. मोठ्या पडद्यावर प्रत्यक्ष जीवनातील शौर्याचा अनुभव घ्या, भारत भाग्य विधाता चित्रपटाची घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. अज्ञात नायकांना चित्रपटाद्वारे आदरांजली वाहिली जाईल असे कंगनाने नमूद पेल आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन मनोज तापडियां करणार आहेत. तर निमर्ती बबीता आशिवाल आणि आदि शर्मा करतील.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article