‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटात कंगना
12 जून रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
अभिनेत्री कंगना रनौत ही स्वत:चा आगामी चित्रपट ‘भारत भाग्य विधाता’वरून चर्चेत आहे. निर्मात्यांकडून आता कंगनाच्या या चित्रपटाचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.
कंगनाच्या या चित्रपटात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांदरम्यान घडलेली एक घटना दर्शविण्यात येणार असून याचा अंदाज ट्रेलर पाहून लावता येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज तापडियाने केले आहे. कंगनाने स्वत:च्या एक्स हँडलवरही या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
एका रुग्णालयातील नर्सचा समूह शौर्याचे उदाहरण देत लोकांचा जीव वाचवत असल्याचे यात दिसून येते. चित्रपटाचा ट्रेलर अत्यंत प्रभावी असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. कंगनाचा हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनासोबत या चित्रपटात गिरिजा ओक, स्मिता तांबे आणि प्रिया बेर्डे यासारख्या अभिनेत्रींनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.