For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुन्हा एकत्र दिसणार कंगना अन् माधवन

07:00 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुन्हा एकत्र दिसणार  कंगना अन् माधवन
Advertisement

‘तनु वेड्स मनु’ आणि त्याचा सीक्वेल ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’मध्ये जबरदस्त केमिस्ट्री दाखविलेले कलाकार कंगना रनौत आणि आर. माधवन पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. यावेळी ही जोडी एका रोमांचक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसून येईल. या चित्रपटाचे नाव ‘सर्कल’ असून तो पुढील काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.एल. विजय करत असून ते दक्षिणेतील ख्यातनाम दिग्दर्शक आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ट्रायडेंट प्रॉडक्शन्सकडून करण्यात आली आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ‘सर्कल’ या चित्रपटाचे चित्रिकरण चेन्नई, ऊटी, जयपूर आणि हैदराबाद या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.  ‘सर्कल’ हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर धाटणीचा असून यात एक रुग्ण आणि डॉक्टरची कहाणी दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रनौत, आर. माधवनसोबत अवंतिका मिश्रा देखील झळकणार आहे. कंगना दीर्घकाळानंतर आर. माधवनसोबत दिसून येणार असल्याने तिचे चाहते उत्सुक झाले आहेत. कंगनासाठी हा चित्रपट महत्त्वपूर्ण असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.