For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंगना अन् माधवन पुन्हा एकत्र

06:56 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
कंगना अन् माधवन पुन्हा एकत्र
Advertisement

तनू वेड्स मनु प्रेंचाइजीच्या यशानंतर अभिनेत्री कंगना रनौत आणि आर. माधवन पुन्हाएकदा आगामी सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये एकत्र काम करण्यासाठी तयार आहेत. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ दोन्ही भाषांमध्ये तयार केला जाणार आहे. खास बाब म्हणजे याच्या चित्रिकरणादरम्यान रजनीकांत यांनी सेटवर येत कलाकारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. चेन्नईत आम्ही नव्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटासंबंधी उर्वरित तपशील लवकरच पुरविणार आहे. रोमांचक पटकथेसाठी तुम्हा सर्व लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वादाची गरज असल्याचे कंगनाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. ‘थलाइवी’नंतर कंगना पुन्हा एकदा दिग्दर्शक विजयसोबत काम करणार आहे. अभिनेत्रीने विजय यांच्यासोबत काम करण्यावरून उत्साह व्यक्त केला आहे. या चित्रपटाला जी.व्ही. प्रकाश कुमार यांच्याकडून संगीत लाभले आहे. अनेक हीट चित्रपटांमधील सिनेमॅटोग्राफीसाठी ओळखले जाणारे नीरव शाह यांची कमाल चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.