केन विल्यम्सनचा केंद्रीय करारास नकार
वृत्तसंस्था / वेलिंग्टन
माजी कर्णधार केन विल्यम्सनने पुन्हा एकदा न्यूझीलंड क्रिकेटसोबतचा केंद्रीय करार नाकारला आहे आणि पुढील महिन्यात न्यूझीलंडच्या झिम्बाब्वे दौऱ्याला तो मुकण्याची शक्यता आहे.
विल्यम्सनने गेल्या वर्षीही केंद्रीय करार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. स्वत:ला टी-20 आणि जगभरातील इतर लीगमध्ये खेळण्यास मोकळे ठेवले. त्याऐवजी त्याने गेल्या वर्षी कॅज्युअल करारावर स्वाक्षरी केली आणि तरीही 2024 मध्ये न्यूझीलंडच्या 13 पैकी 9 कसोटींमध्ये खेळला आणि 1000 पेक्षा जास्त धावा केल्या. मंगळवारी न्यूझीलंड क्रिकेटने जाहीर केलेल्या 20 करारबद्ध खेळाडूंच्या यादीत विल्यम्सनचा समावेश नव्हता. त्यांच्यासोबत डेव्हॉन कॉनवे, फिन अॅलन, टिम सेफर्ड आणि लॉकी फर्ग्युसन देखील परदेशात टी-20 लीगमध्ये खेळत आहेत. तो पुन्हा कॅज्युअल करारावर स्वाक्षरी करेल, अशी अपेक्षा आहे. निवृत्त झालेल्या टीम साऊथी, ईश सोधी, एजाज पटेल आणि जोश क्लार्कसन यांच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू मुहम्मद अब्बास आणि झॅक फॉल्क्स, यष्टीरक्षक मिच आणि फिरकीपटू आदी अशोक यांना पहिल्यांदाच करारबद्ध करण्यात आले आहे.
विल्यमसन सध्या इंग्लिश काऊंटी चॅम्पियनशिप आणि टी-20 ब्लास्टमध्ये मिडलसेक्सकडून आणि द हंड्रेडमध्ये लंडन स्पिरिटकडून खेळत आहे. जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या सुरुवातीला न्यूझीलंड झिम्बाब्वेविरुद्ध खेळत असताना त्याला काऊंटीमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विल्यम्सन म्हणाला की, कॅज्युअल कॉन्ट्रॅक्टवरील त्याचे भविष्य केवळ प्रगतिपथावर आहे.
गेल्या वर्षभरातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या आधारे 20 करारबद्ध खेळाडूंना क्रममवारी देण्यात आली. न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट वीनिंग म्हणाले, ‘मिच, मुहम्मद आणि झॅक यांच्यासोबतचे करार आमच्या प्रणालीतून येणाऱ्या अविश्वसनीय प्रतिभेचे प्रतिबिंब आहेत. या खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते सर्वोच्च पातळीवर स्पर्धा करु शकतात आणि ब्लॅक कॅम्सचे प्रतिनिधीत्व करण्याची त्यांची भूक रोमांचक आहे. हा गट आमच्या संघाला पुढे नेत असल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे.’