For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | शुल्लक कारणावरून कांडगाव पेटले! मोटार उभी करण्याच्या वादातून दोन कुटुंबात फ्री-स्टाईल हाणामारी

01:13 PM Mar 29, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   शुल्लक कारणावरून कांडगाव पेटले  मोटार उभी करण्याच्या वादातून दोन कुटुंबात फ्री स्टाईल हाणामारी
Advertisement

                             कांडगावात पार्किंगवरून वाद

Advertisement

कोल्हापूर - मोटार दारात उभी केल्याच्या कारणातून कांडगांव - (ता. करवीर) येथे दोन कुटूंबात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबातील चौघेजण जखमी झाले, याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात आठ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला. शुक्रवार (२७ मार्च) रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी रात्री शरद शिंदे यांनी त्यांची मोटार मारूती संकपाळ यांच्या दारात उभी केली होती. मोटार बाजूला घ्या असे सांगण्यासाठी गेलेल्या मारुती संकपाळ यांनाकाठी, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. वाद मिटविण्यासाठी गेलेल्या सविता मारुती संकपाळ (वय ४५) यांनाही मारहाण झाली.

Advertisement

याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद भिकाजी शिंदे, विजय भिकाजी शिंदे, भिकाजी शिंदे, पवन शरद शिंदे, शिवानंद विजय शिंदे, सोनाली विजय शिंदे (सर्व रा. कांडगाव) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विजयकुमार भिकाजी शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी सोनाली शिंदेडी मारहाणीत जखमी झाल्या. त्यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून मारूती धोंडीराम संकपाळ, सविता मारूती संकपाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Advertisement
Tags :

.