For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

कंदलगाव येथे डोक्यात दगड घालून वीटभट्टी कामगाराचा खून; मोबाईलच्या वादातून हत्या, चार तासांत आरोपीला अटक

09:23 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंदलगाव येथे डोक्यात दगड घालून वीटभट्टी कामगाराचा खून  मोबाईलच्या वादातून हत्या  चार तासांत आरोपीला अटक
Advertisement
अभिजीत जवळकोटे

कंदलगाव : मोबाईल चोरीच्या संशयावरून झालेल्या वादातून वीटभट्टीवरील एका कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना कंदलगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चार तासांत संशयित आरोपीला अटक केली.

Advertisement

बुद्धाप्पा तिपण्णा देसाई (वय ४०, रा. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. संजय परशुराम धरेनवर (रा. सालोटगी, ता. इंडी, जि. विजयपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदलगाव-गावडेवाडी रस्त्यावरील कंदलगाव हद्दीत दीक्षित यांची वीटभट्टी आहे. येथे कर्नाटकातील इंडी तालुक्यातील कामगार काम करतात. रविवारी सायंकाळी मोबाईलच्या कारणावरून बुद्धाप्पा देसाई आणि संजय धरेनवर यांच्यात वाद झाला. आपला मोबाईल बुद्धाप्पाने घेतल्याचा संशय व्यक्त करत संजयने दारूच्या नशेत त्याला त्याच्या पत्नीसामोर मारहाण केली. त्यानंतर इतरांनी मध्यस्थी करून दोघांमधील भांडण मिटवले.

Advertisement

रात्री बुद्धाप्पा आपल्या झोपडीत झोपले असताना, मध्यरात्रीनंतर आणि सोमवारी पहाटे तीन वाजण्यापूर्वी संजय तेथे गेला. मोबाईल हरवल्याच्या रागातून त्याने मोठा दगड बुद्धाप्पाच्या डोक्यात घातल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बुद्धाप्पाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, पीएसआय खाजा मुजावर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित संजय धरेनवर याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Tags :

.