अनोख्या विषयावर काम्याचा चित्रपट
डिजिफिल्मिंग आणि मिररो फिल्म्सने ‘मी नो पॉज मी प्ले’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. मेनोपॉजवर आधारित हा भारताचा पहिला फिचर फिल्म ठरणार आहे. याचबरोबर सामाजिक जागरुकतेकरता एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. महिलांचे आरोग्य, भावनात्मक बदल आणि आत्मस्वीकृतीविषयी चर्चेला सामान्य स्वरुप देणे हा या चित्रपटामागील उद्देश आहे. लेखक आणि निर्माते मनोज कुमार शर्मा यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपट ‘मी नो पॉज मी प्ले’ एक अशा विषयावर मौन सोडतो, जो बऱ्याचअंशी दुर्लक्षिण्यात आलेला आहे आणि जीवनाच्या या स्वाभाविक टप्प्यादरम्यान महिलांचे आरोग्य, भावना आणि ओळखीवर प्रकाश टाकतो. हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. हा चित्रपट मेनोपॉजच्या अवघड काळातून जाणाऱ्या महिलांच्या प्रामाणिक अनुभवांना समोर आणण्यासोबत त्यांचे साहस, आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधाची भावपूर्ण कहाणी मांडणार आहे. चित्रपटात काम्या पंजाबी मुख्य भुमिका साकारत आहे. तिच्यासोबत दीपशिखा नागपाल, मनोज कुमार शर्मा, सुधा चंद्रन, एमी मिसोब्बा आणि अमन वर्मा देखील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हे सर्व कलाकार नारीत्व आणि आत्मस्वीकृतीच्या यात्रेच्या विविध दृष्टीकोनांना पडद्यावर साकार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.