हलगेकर कुस्ती समितीतर्फे कामेश पाटीलचा गौरव
02:51 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : म्हैसूर येथे दसरा क्रीडा महोत्सव निमित्त दसरा कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या कामेश पाटील कंग्राळीने किरणचा पराभव करून दसरा कंठीरवा किताब पटकाविल्याबद्दल चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्यावतीने त्याचा खास सत्कार करण्यात आला. अंतिम सामन्यात बेळगावच्या कामेश पाटीलने किरणचा 4-0 असा पराभव करून दसरा कंठीरवा किताब पटकाविला. त्याची बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीच्यावतीने कामेशचा शाल, श्रीफळ देऊन संस्थेचे अध्यक्ष अशोक हलगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, विश्वनाथ पाटील, भाऊ पाटील, प्रशांत पाटील, रोहित पाटील व इतर कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement