For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कान चित्रपट महोत्सवात कल्याणीचा सहभाग

06:44 AM May 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
कान चित्रपट महोत्सवात कल्याणीचा सहभाग
Advertisement

‘लोका चॅप्टर वन : चंद्रा“च्या यशानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे. कल्याणी 14 मे रोजी चित्रपट महोत्सवात भाग घेतला आहे. कल्याणीसाठी ही मोठी कामगिरी आहे. जगातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान महोत्सवातील पदार्पणाकरता कल्याणीने आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement

कान फिल्म फेस्टिव्हल नेहमीच चित्रपटाचा एक प्रतिष्ठित उत्सव राहिला आहे. लोक चॅप्टर वन : चंद्राला मिळालेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. भारतीय चित्रपटाला सध्या जागतिक स्वरुपात एक आकर्षक ओळख मिळत असल्याचे मला वाटते. अशास्थितीत ‘लोका“द्वारे आंतरराष्ट्रीय  स्तरावर ओळख निर्माण करणे आणि आता कान चित्रपट महोत्सवासारख्या व्यासपीठाचा अनुभव घेणे अत्यंत चांगले वाटतेय असे कल्याणीने म्हटले आहे. फ्रान्सच्या फ्रेंच रिवेराच्या कान शहराच्या ‘पॅलेस डेस फेस्टिव्हल्स“मध्ये हा प्रतिष्ठित वार्षिक समारंभ पार पडला आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी अनेक भारतीय कलाकार स्वत:ची उपस्थिती नोंदवत असतात. आता या यादीत कल्याणीचे नाव जोडले गेले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.