‘जिनी’ चित्रपटात कल्याणी प्रियदर्शन
दाक्षिणात्य अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शन स्वत:चा आगामी चित्रपट ‘जिनी’साठी अत्यंत उत्सुक आहे. या चित्रपटाचे ‘आब्दी आब्दी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे. या गाण्यावरून अभिनेत्रीने एक पोस्टही केली आहे. एक कलाकार म्हणून मी नेहमीच स्वत:ला अशा गोष्टींसाठी प्रेरित केले आणि आव्हान देण्याचा प्रयत्न केला, ज्या मी पूर्वी कधीच केल्या नव्हत्या. हे गाणे देखील अशाच क्षणांपैकी एक होते. दिग्दर्शक भुवनेशने याविषयी मला सांगितल्यावर इतक्या सुंदरपणे एक व्यावसायिक संगीतमय रचनेला ‘जिनी’च्या कहाणीचा एक वास्तविक आणि महत्त्वपूर्ण हिस्सा कसे करण्यात आले, याचेच मला आश्चर्य वाटले. या चित्रपटाकरता आम्ही प्रचंड मेहनत केली असून काही नवे करण्याचा प्रयत्न केला असल्याचे कल्याणीने म्हटले आहे. जयम रवि आणि कल्याणी प्रियदर्शनचा आगामी चित्रपट जिनीचे दिग्दर्शन भुवनेश अर्जुनन यांनी केले आहे. या चित्रपटात कृति शेट्टी आणि वामिका गब्बी देखील मुख्य भूमिकेत आहे. जिनी चित्रपटाला ए.आर. रहमान यांचे संगीत लाभले आहे.