For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कल्पतरु प्रोजेक्टसला मिळाले कंत्राट

06:33 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
कल्पतरु प्रोजेक्टसला मिळाले कंत्राट
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी कल्पतरु प्रोजेक्टस इंटरनॅशनलला गॅस पाईपलाइनकरीता संयुक्त अरब अमिरातमधून नवे कंत्राट प्राप्त झाले आहे. 4000 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट कंपनीला मिळाल्याची माहिती आहे. शेअरबाजारात कंपनीचा समभाग 52 आठवड्याच्या नीचांकावरुन 38 टक्के तेजीसह कार्यरत आहे. ऑईल व गॅस व्यवसायासाठी कंपनीला मोठे इपीसी कंत्राट मिळाले आहे. अभियांत्रीकी, साहित्य खरेदी व निर्मितीचे काम कंपनी करते.

काय म्हणाले एमडी

Advertisement

कल्पतरु प्रोजेक्टस् कंपनीचे एमडी म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक मनीष  मोहलोत याप्रसंगी म्हणाले की हे नवे कंत्राट जागतिक आणि तेल व गॅस क्षेत्रात कंपनीची मजबुती दर्शवत आहे. जुन्या चांगल्या कामांची दखल घेतली जात असून कंपनीला याबाबतीत अधिक मजबुती प्राप्त करता येत आहे. कंपनीची तांत्रिक क्षमता, काम करण्याची क्षमता व जगभरात आपला व्यवसाय वाढवण्याच्या क्षमतेचा विचार करुनच हे नवे कंत्राट मिळाले आहे.

कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केले असून कंपनीने 45 टक्के वाढीसह 310 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. नफा मागच्या वर्षी कंपनीने 214 कोटी रुपयांचा मिळवला होता. कंपनीने याचदरम्यान 4 टक्के वाढीसह 6401 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात यश मिळवलं होतं.

कंपनीचा विस्तार

कल्पतरु प्रोजेक्टस् ही जगभरात आपली सेवा देते आहे. इपीसी कंपन्यांपैकी ही एक कंपनी असून 75 देशांमध्ये आपला व्यवसाय कंपनी करते. विविध क्षेत्रात अभियांत्रीकी, साहित्dया खरेदी व निर्मितीशी संबंधीत सेवा पुरवते. यात ऊर्जा वितरण, इमारत व कारखाना, पाण्याचा पुरवठा व शुद्धीकरण, रेल्वे, तेल व गॅस पायाभूत सुविधा, अर्बन मोबिलीटी, हायवे व एअरपोर्ट यासंबंधीत सेवाही कंपनी देते.

Advertisement
Tags :

.