कल्पतरु प्रोजेक्टस्ला मिळाले 2366 कोटीचे कंत्राट
नवी दिल्ली :
बांधकाम क्षेत्रातील कंपनी कल्पतरू प्रोजेक्टस् यांचा समभाग मंगळवारी 5 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. कंपनीला 2366 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्याने त्याचे सकारात्मक परिणाम समभागावर मंगळवारी दिसून आले. बांधकाम क्षेत्रातील कंपनी कल्पतरू प्रोजेक्टस इंटरनॅशनल लिमिटेड यांचे समभाग मंगळवारी शेअरबाजारात 5.42 टक्के इतके वाढत 1032 रुपयांच्या स्तरावर पोहोचले होते. कंपनीला 2366 कोटी रुपयांचे कंत्राट प्राप्त झाले आहे.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मनीष मोहनत म्हणाले की या आत्ताच्या कंत्राटासह एकंदर कंपनीच्या ताफ्यामध्ये 24 हजार 850 कोटी रुपयांचे काम मिळालेले आहे. मंगळवारी कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 17 हजार 209 कोटी रुपयांवर पोहोचले होते.
30 देशात प्रकल्पांचे काम
कंपनीचे जवळपास 30 पेक्षा अधिक देशांमध्ये विविध प्रकल्पांचे काम सुरू असून एकंदर 75 देशांमध्ये कंपनी कार्यरत आहे. संघटनात्मक भांडवलाचा आधार, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कंपनी आपले प्रकल्प यशस्वीपणे राबवत आली आहे.