महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कळे-फुलेवाडी रस्ते कामाला भूसंपादनाचा खोडा; बालिंगा पुलाचे काम वगळता मे अखेर रस्त्याचे काम होणार पूर्ण

11:58 AM Mar 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
Kale-Phulewadi road works
Advertisement

जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ राबवण्याची गरज; शासकीय जागेच्या ठिकाणी रस्त्याचे काम गतीने सुरु;

Advertisement

मरळी ते सांगरूळ फाट्यापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण

Advertisement

कृष्णात चौगले कोल्हापूर
फुलेवाडी-कळे राष्ट्रीय महामार्गाच्या दुपरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. या रस्त्यासाठी खासगी मालकीची सुमारे 2 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. महसूलसह अन्य संबंधित विभागाकडून ही प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्यामुळे काम गतीने पूर्ण होण्यासाठी मर्यादा येत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने पार पडल्यास मे 2024 अखेरपर्यंत रस्त्याचे 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण होईल असा ठेकेदार कंपनीचा दावा आहे.

जालना येथील व्ही.पी.सेट्टी कंपनीकडून हे काम सुरू आहे. बालिंगा येथे होणाऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी एका बाजूस शासकीय जमीन असली तरी दुसऱ्या बाजूस खासगी जमीन आहे. या जमिनीचे तत्काळ भूसंपादन होणे आवश्यक आहे. हा रस्ता 16 मीटरचा होणार असल्यामुळे फुलेवाडी ते बालींगा दरम्यान अनेक ठिकाणची बांधकामे काढावी लागणार आहेत. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार असून त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे कंपनीकडून प्रथम मरळी येथून रस्ते कामास सुऊवात केली असून कोपार्डे गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील काम पूर्ण झाले आहे. तेथून पुढे दोनवडेपर्यंत रस्त्याच्या उत्तरेकडील एक बाजूचे काम पूर्ण झाले असून दक्षिणेकडील बाजुचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील चढ-उतार काढले जात असल्यामुळे ज्या ठिकाण पूर्वीचा रस्ता सखल आहे, तेथे थोडा भराव टाकून रस्त्याची समान उंची केली जात आहे. त्यामुळे मरळी पुलाच्या पुर्वेकडील सखल भागात रस्त्याची उंची थोडी वाढवली आहे. गावहद्दीतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गावाशेजारी 1 मीटर ऊंदीचे काँक्रीट गटर्स बांधले जाणार आहे. यामध्ये कळे गावहद्दीत 1 किलोमीटरचे, मरळी 550 मीटर, भामटे 700 मीटर, कोपार्डे 500 मीटर, बालिंगा 550 मीटर तर फुलेवाडी हद्दीत 1540 मीटरचे गटर बांधले जाणार आहे.

रस्ते कामामुळे अपघातांची मालिका
तळकोकणाला जोडणारा रस्ता म्हणून कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ओळखला जातो. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुऊ आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठे ख•s पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी साचली आहे. धुळीचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी रस्ते अपघातामध्ये गेल्या चार महिन्यांत अनेकांचा बळी गेला आहे. याचा गांभिर्याने विचार करून रस्त्याच्या ज्या बाजूने वाहतूक सुरू आहे, त्या बाजूने वाहतुकीसाठी योग्य असा तात्पुरता रस्ता करावा अशी वाहनधारकांची मागणी आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मानांकनाप्रमाणे कळे-फुलेवाडी काम सुरू आहे. सध्या सुमारे 8 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या मोहऱ्यांचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.

मोटरसायकलसाठी 5 फुटांची स्वतंत्र लेन
अपघात होऊ नयेत यासाठी दक्षता म्हणून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दीड मीटरची मोंटरसायकल लेन (पट्टा) केली जाणार आहे. या लेनमधूनच दुचाकीस्वारांनी प्रवास करणे बंधनकारक राहणार आहे.

काही ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप
रस्ते कामास सुरूवात झाल्यानंतर प्रथम मरळी येथून उत्तरेकडील एक बाजूचे काम सुरू झाले. हे काम अतिशय तंतोतंत आणि दर्जेदार झाले आहे. पण रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूचे काम हे ओबडधोबड आणि घाईगडबडीने झाले असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या मोजमापामध्येही फरक दिसत असून रस्त्याची रूंदी फार कमी आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मर्जीप्रमाणे काम सुरू आहे काय ? रस्त्याच्या गुणवत्तेकडे कोण लक्ष देणार ? असा प्रश्न नागरीकांतून उपस्थित केला जात आहे.

कळंबे येथील रस्त्याशेजारील घर शासकीय जागेतच
कळंबे गावांनजीक रस्त्यालगत असलेले एक जुने घर शासकीय जागेतच असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे रस्ते कामासाठी हे घर हटवले जाणार आहे. ती जागा वैयक्तिक मालकीची नसल्यामुळे त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची गरज नाही. त्यामुळे महामार्ग विभागाकडून लवकरच घर काढण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
Balinga bridgeKale-Phulewadi roadLand acquisition
Next Article