Kolhapur news | कळे बाजारपेठ रस्ता ३१ मे पर्यंत बंद! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; असा असेल पर्यायी मार्ग
कळे बाजारपेठेतील रस्ता ३१ मेपर्यंत वाहतुकीसाठी बंद
कोल्हापूर -प्र.जि.मा. ७८ वरील कळे बाजारपेठ, दस्तुरी चौक ते देसाई गल्ली फाटा मार्गावर सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता मंगळवार दि. २८ पासून वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा रस्ता ३१ मेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड व हलक्या वाहतुकीसाठी बंद केल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले आहेत. दरम्यान, ३१ मेपर्यंत पर्यायीवाहतूक व्यवस्था केली आहे. यामध्ये गगनबावडाकडून बाजारभोगांव, अणुस्कुरा घाटाकडे जाणाऱ्या हलक्या ४ चाकी वाहनांकरीता राष्ट्रीय महामार्ग १६६ जी पासून हरिजन बस्ती कमान ते मराठी शाळा चौक दुहेरी वाहतूक व शाळा चौक ते पुनाळ फाटा एकेरी वाहतूक व तिथून पुढे प्र.जि.मा. ७८ बरून तळेबाडी असा पर्यायी रस्ता आहे
कामात तांत्रिक अडचणींमुळे निर्णय
कळे गावातकाँक्रीट रस्ता व आरसीसी गटर्सचे बांधकाम करण्यात येत आहे. काँक्रीटच्या दोन्ही थरांना किमान २८ विवस 'क्युरिंग आवश्यक असल्याने या कालावधीत कोणतीही वाहतूक करणे शक्य नसते. बाजारपेठेतील गर्दी, झाडे व विद्युत तारांमुळे सुरक्षेच्या दृष्टीनेही मर्यादा येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तर अणुस्कुराकडून गगनबावडाकडे जाणाऱ्या हलक्या ४ चाकी बाहनाकरीता कळे एसटी स्टॅड ते मराठी शाळा चौक एकेरी वाहतूक वतेथून पुढे राष्ट्रीय महामार्ग १६६ जी या दैनंदिन मार्गाने गगनबावड्याकडे जाता येणार आहे.
कोल्हापूर आणि गगनबावडाकडून येणाऱ्या अवजड वाहनांकरिता राष्ट्रीय महामार्ग १६६ जी वरून प्र.जि.मा. १८वरून कोपार्डे फाटापासून पडळ फाटा ते रा.मा. १९३ बरून पुनाळ फाटा, काटेभोगाव फाटा तिथून पुढे दैनंदिन मार्गाने बाजार भोगाव मार्ग अणुस्कुरा तर अणुस्कुरामार्गे येणाऱ्या वाहनांकरिता रा.मा. १९३ बरून काटेभोगाव फाटा पासून पडळ फाटा ते कोपर्डे फाटा मार्ग राष्ट्रीय महामार्ग १६६ जी तिथून पुढे दैनंदिन मार्गाने कोल्हापूर किंवा गगनबावडा असा राहणार आहे.