For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : 'चांगभलं'च्या जयघोषात काळभैरीची पालखी डोंगरावर

06:27 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news    चांगभलं च्या जयघोषात काळभैरीची पालखी डोंगरावर
Advertisement

                               लाखो भाविकांच्या उपस्थितीत काळभैरी पालखी मिरवणूक

Advertisement

गडहिंग्लज : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असणाऱ्या काळभैरीच्या यात्रेला उत्साहात सुरुवात शाली, पैरीच्या नावानं चांगभलं असे म्हणत पी दयाकच्या गजरात गुलालाची उथळण करत ग्रामदैवत काळभैरीची पालखी सोमवारी सायंकाळी गडहिंग्लज येवून डोंगरावरील मंदिराकडे रवाना झाली. मुख्य रस्त्याने निघालेल्या मिरवणुकीला अभुतपूर्व उत्साहात भाविकांची गर्दी झाली होती. आज मंगळवारी डोंगरावर काळभैरीची यात्रा भरत असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी मिरवणुकीत यावर्षी चोरीच्या घटनांना पूर्ण आळा बसल्याचे दिसून आले.

शिवाजी चौकातील काळभैरी मंदिरात दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलवार ऋषिकेत शेळके, हक्कदार, मानकरी डोमणे, उपराटे, पंचकमिटी, यात्रा कमिटी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीची सजावट करण्यात आली होती. त्यामध्ये सोन्याचा मुखवटा काळभैरीला परिचान करून पुजण्यात आले होते.

Advertisement

गुलालाच्या उधळणीत भैरीची  पालखी मार्गावर फुले, गुलाबी रंगाचे चांगभलंचे पताके, मोठे गोहे, रांगोळी घालून स्वागत केले. ठिकठिकाणी गोडे विक्री करणाऱ्यांची संख्या अधिक होती. पालखी मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर हनुमान मंदिर, नेहरू चौक, बाजारपेठ, वीरशैव बैंक चौक, काळभैरी रोड, लाखेनगरात पालखी दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. तरुण मंडळे, सामाजिक संस्था, भाविक पालखी मिरवणुकीत सहभागी होते. गुलालाची मुक्त उधळण करत, पी ढबाक, हलगीच्या निनादात चांगभलंच्या जयघोषात पालखीची मिरवणूक काढली. गोंड्याची सासनकाठीही पालखीपासून पुढे ठेवण्यात आल्याने पालखीतील मूर्तीचे दर्शन घेणे सोपे होते.

साडेपाचच्या सुमारास मुख्य मार्गावरील वीरशैव चौकात पालखी आल्यानंतर चारही बाजूने दर्शनासाठी गर्दी उसळली. पालखी पुढे काळभैरी मार्गावर आल्याने भक्तांनी गर्दी वाढताना दिसत होती. लाखेनगर कमानी येथील पादुकाजवळ
आरती झाली. पालखीच्या मागून तरूण मंडळानी सजवलेल्या चारचाकी, ट्रॅक्टर, टेंपो मोठे गोंडे घेऊन जात होते. त्यानंतर पुढे बड्याचीवाडीतून रात्री शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या डोंगरावरील काळभैरी मंदिरात स्थानापन्न झाली. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांच्यासह मोठा पोलिसांचा बंदोबस्त होता. माजी सैनिक, पोलीस पाटील यांचा बंदोबस्तासाठी सहभाग घेण्यात आला होता.

रात्री उशिरागतवर्षी काळभैरी पालखीच्या मिरवणुकीच्यावेळी सुमारे ३५ तोळे सोने, मोबाईल, पर्स, पाकीटे मारली होती. याची दखल घेत यावर्षी पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी गुलाल, कागद उडवणाऱ्या मशिनवर बंदी आणली होती. तर बंदोबस्तासाठी पोलीस पाटील, माजी सैनिक यांची मदत घेण्यात आली होती. याचा फायदा झाल्याचे दिसून आले. गुलाल उधळणारी एकही मशिन मिरवणुकीत नव्हती, तर चोरीच्या घटनाही घडल्या नसल्याचे दिसून आल्या. नव्या नियोजनाचा फायदा झाल्याचे पहावयास मिळाले.

डोंगरावरील काळभैरी मंदिरात शासकीय पूजा झाल्यानंतर दर्शनासाठी मंदिर सर्वांना खुले होणार आहे. आज मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस राहणार असून दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी गडहिंग्लज आगाराने २५ हून अधिक विशेष गाड्यांची सोय केली आहे. त्यासाठी गडहिंग्लज शहर आणि डोंगरावर विशेष बसस्थानकाची उभारणी केली आहे. काही मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळवण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी शासकीय पातळीवर मोठी दक्षता घेण्यात आल्याचे पहावयास मिळाले.

Advertisement
Tags :

.