For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1971 च्या युद्धाचा नायक कालवश

06:26 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
1971 च्या युद्धाचा नायक कालवश
Advertisement

माजी नौदलप्रमुख अॅडमिरल रामदास यांचे निधन

Advertisement

 वृत्तसंस्था/ हैदराबाद

भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल (सेवानिवृत्त) लक्ष्मीनारायण रामदास यांचे शुक्रवारी हैदराबाद येथील सैन्य रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 90 वर्षांचे होते. रामदास यांनी डिसेंबर 1990 पासून सप्टेंबर 1993 पर्यंत नौदल प्रमुख म्हणून काम पाहिले होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.

Advertisement

वयोपरत्वे झालेल्या आजारांमुळे रामदास यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबात त्यांच्यामागे पत्नी ललिता रामदास आणि तीन कन्या आहेत. रामदास हे पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीशी जोडले गेले होते. दक्षिण आशियाला सैन्यीकरणापासून दूर करणे आणि आण्विक निशस्त्राrकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे 2004 साली रामदास यांना रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवाल यांनी अनेक प्रख्यात व्यक्तिमत्त्वांसोबत आम आदमी पक्ष स्थापन केला होता, तेव्हा अॅडमिरल रामदास यांनी मोठे योगदान दिले होते.  केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने अॅडमिरल रामदास यांनी पक्षाच्या अंतर्गत लोकपाल समुहाची जबाबदारी सोपविली होती. परंतु 2015 मध्ये दिल्लीत प्रचंड बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्री झालेल्या केजरीवालांनी अनेक संस्थापक सदस्यांना पक्षातून बाहेर काढले हेते. यात अॅडमिरल रामदास यांचाही समावेश होता.

Advertisement
Tags :

.